लाखों रुपये कमवून देणार्या ऑफरला लाथ मारली
नगर जिल्ह्यातील या आमदारांनी केला गौप्यस्फोट
अकोले । वीरभूमी- 22-Mar, 2021, 12:00 AM
अकोले तालुक्यात शिंदवड-लिंगदेव येथे एमआयडीसी उभी करण्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘एमआयडीसी उभारणीसाठी तुम्ही जमिनी विकत घ्या. तुमच्याकडून एमआयडीसीसाठी जमिनी विकत घेऊ. त्यात तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ’, अशी ऑफर मला आली होती. मात्र त्या ऑफरला मी लाथ मारली, असा गौप्यस्फोट आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला.अकोले तालुक्यातील कोतुळ येथील पुलाचे सोमवारी आमदार लहामटे यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. या पुलासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले असून पुलाचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल, शेतकर्यांनी जलसंपदा विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख हे होते. आमदार डॉ. लहामटे पुढे म्हणले की, पुलाचे काम होणे हे मुळा विभागाचे विकासाचे दृष्टीने महत्वाचं आहे. तालुक्यातील कोतुळ ही मोठी बाजार पेठ आहे. पुलाचे काम करताना लाभधारक शेतकर्यांची नुकसान होणार नाही, ही भूमिका प्रशासनाची राहील. माझ्या आगोदर ज्यांनी पाण्याचे राजकारण केले, तसे माझ्या कडून होणार नाही. खालचे आणि वरचे असा भेदभाव मी करणार नाही. मी संपूर्ण मतदारसंघाचा पालक आहे, तशीच भूमिका माझी राहील. विरोधक पाण्याचा वाद निर्माण करून जनतेत विष कालवून संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप आ. लहामटे यांनी केला.
माझा नेता शरद पवार हे आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाला खाली तालुक्यात विकासकामे पूर्ण करण्यात येत आहे. पिंपळगाव खांड धरण व कोतुळ पुलासासाठी अजितदादा पवार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने हे काम मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख म्हणाले की, समाजाचे प्रश्नांची जाण असणारा नेता अजितदादांनी खमकी भूमिका घेतल्याने पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती झाली. त्यावेळी कोतुळचा पूल पाण्यात बुडणार हे माहीत असतानाही तालुक्यातील नेतृत्वाने हा प्रश्न जाणीवपूर्वक मागे ठेवला. त्याचे परिणाम मुळा परिसराने भोगले आहेत.
मी प्रशासनात सेवेत असताना अनेक आमदार पाहिले. मात्र आमदार लहामटे सारखा जनतेसाठी रात्रंदिवस पळणारा माणूस प्रथमच पाहिल्याचे सांगत, विरोधक जे चालले आहे. त्यात तंगड्या टाकून त्या कामात अडथळे आणून आपले पाप झाकण्याचे काम करत असल्याचा आरोप बी. जे. देशमुख यांनी केला.
यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप यांनी पुलाचे कामाची तांत्रिक माहिती दिली. या प्रसंगी उद्योजक सुरेश गडाख, युवा नेते सचिन नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, कॉ. सदाशिव साबळे, अभिजित देशमुख, सचिन गीते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, कैलास शेळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या स्वाती शेणकर, ओबीसी सेलच्या उज्ज्वला राऊत, रामनाथ शिंदे, नवनाथ गायकवाड, नामदेव भांगरे, नारायण डोंगरे, कोतुळचे सरपंच भानुदास लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, शंकरराव देशमुख, संगीता भुजबळ, जलसंपदाचे उपविभागीय अधिकारी संदीप देशमुख, शाखा अभियंता नानासाहेब खर्डे, शिवा इन्स्ट्राकचरचे संचालक मुकुंद देशमुख, सिनियर प्रोजेक्ट्स मॅनेजर डी. एन. मोहिते, प्रकल्प प्रमुख अलोककुमार सिंग, ईश्वर वाकचौरे, अशोक माळी, अरुण रुपवते, सयाजीराव देशमुख, चंद्रकांत घाटकर, शाम देशमुख, फारूक पठाण, सुरेश देशमुख, बापूसाहेब देशमुख, गुलाब खरात आदीसह परिसरातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख व रवींद्र आरोटे यांनी सूत्रसंचालन केले तर पूल कृती समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी आभार मानले.
Tags :
FGsnkRuUPvAXabKM