अहमदनगर । वीरभूमी- 22-Dec, 2022, 02:46 PM
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य या संस्थेचा शाखा विस्तार करण्याच्या उद्देशाने शहर जिल्हाध्यक्षपदी येथील राजेंद्र चोभे यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक कवींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कथाकथन, काव्य संमेलन, पुस्तक परिसंवाद, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशनअसे विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.
वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. सर्व तालुक्यांमध्ये शब्दगंधच्या शाखांचा विस्तार करण्यात येत असून त्यासाठी कार्यकारी मंडळातील सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. राजेंद्र चोभे साहित्यिक असून विविध वृत्तपत्रांमध्ये सातत्याने लेखन करत असतात. आपल्या लेखन कलेच्या माध्यमातून ते सर्वत्र परिचित असून विविध संस्था संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत.
शब्दगंधच्या नावलौकिकामध्ये भर घालण्याचा प्रयत्न मी करणार असून नवीन येणार्या सर्वांना जोडून घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करू. शब्दगंधचे सर्वच कार्यक्रम लोकाभिमुख होण्यासाठी राजेंद्र उदागे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू, असे मत राजेंद्र चोभे यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, अजयकुमार पवार, शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, किशोर डोंगरे, ऋता ठाकूर, स्वाती ठुबे, आनंदा साळवे, शर्मिला गोसावी, बबनराव गिरी, जयश्री झरेकर, बाळासाहेब शेंदूरकर, प्रा. डॉ. अशोक कानडे, शाहीर भारत गाडेकर, भगवान राऊत, राजेंद्र पवार, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, राजेंद्र फंड यांचेसह शब्दगंधचे सर्व तालुका अधिकारी उपस्थित होते.
राजेंद्र चोभे यांचे यांचे प्रमोद देशपांडे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रा. डॉ. शंकर चव्हाण, प्रा. डॉ. मिलिंद कसबे, अॅड. सुभाष लांडे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
i7k6iq