अहमदनगर । वीरभूमी - 25-Mar, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या वाढत्या आकडेवारीचे आज कहरच केला.
गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंतच जिल्ह्यात तबब्ल 1338 कोरोना बाधित आढळले. यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे सनकट आणखी गडद होऊ लागले आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहीले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंतच जिल्ह्यातील रुग्ण संख्येत 1338 ने वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस वाढणार्या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. आज सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 457 आढळली असून त्या खालोखाल संगमनेर 148, राहाता 140, कोपरगाव 101, अकोले 74, शेवगाव 71, श्रीरामपूर 69, नगर ग्रामीण 51, पारनेर 46, जामखेड 37, पाथर्डी 30, राहुरी 26, नेवासा 24, श्रीगोंदा 19, इतर जिल्हा 16, कर्जत 15, कन्टेंन्मेंट बोर्ड 14 अशी रुग्ण संख्येचा समावेश आहे.
आज गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 511, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 655 आणि अँटीजेन चाचणीत 172 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 194, संगमनेर 31, राहाता 34, कोपरगाव 45, अकोले 39, शेवगाव 47, श्रीरामपूर 14, नगर ग्रामीण 24, पारनेर 20, जामखेड 25, पाथर्डी 10, राहुरी 03, नेवासा 08, श्रीगोंदा 11, कंन्टेन्मेंट बोर्ड 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, संगमनेर 116, राहाता 93, कोपरगाव 55, अकोले 27, शेवगाव 08, श्रीरामपूर 51, नगर ग्रामीण 22, पारनेर 12, पाथर्डी 01, राहुरी 15, नेवासा 05, श्रीगोंदा 03, इतर जिल्हा 14, कर्जत 03, कंन्टेन्मेंट बोर्ड 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 172 जण बाधित आढळुन आले. मनपा 40, संगमनेर 01, राहाता 13, कोपरगाव 01, अकोले 08, शेवगाव 16, श्रीरामपूर 04, नगर ग्रामीण 05, पारनेर 14, जामखेड 12, पाथर्डी 19, राहुरी 08, नेवासा 11, श्रीगोंदा 05, इतर जिल्हा 02, कर्जत 12, कंन्टेन्मेंट बोर्ड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
Dj Sidharth NGRWALA