या गावात मास्क न वापरणार्या 27 जणांवर दंडात्मक कारवाई
पाथर्डी । वीरभूमी- 27-Mar, 2021, 12:00 AM
पाथर्डी पंचायत समितीच्या पथकाने तालुक्यातील मिरी येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये 27 जणांकडून दंड वसूल करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाबाबत जनजागृती केली.
पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी नुकतेच आदेश काढून गावामध्ये विनामास्क फिरणार्या व्यक्ती, कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन न करणार्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसा याबाबत त्यांनी आदेशही काढला आहे.
या आदेशाने आज शनिवारी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांच्यासह ग्रामसेवक रवी देशमुख, राजेंद्र साखरे, प्रमोद मस्के, ग्रामपंचायत कर्मचारी जयदीप गवळी, संभाजी घोरपडे यांच्या पथकाने केली.
या कारवाईमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणार्या सुमारे 27 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या सर्वांकडून दंड वसूल करून यापुढे कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करण्याबाबत सांगितले. तसेच पथकाने मिरी ग्रामस्थांना नियमित मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करणे, विनाकारण घरा बाहेर पडू नये, सॅनिटायझरचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत याबाबत जनजागृती करण्यात आली.
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन विस्ताराधिकारी प्रशांत तोरवणे यांनी केले.
udRwKLobNxX