अहमदनगर । वीरभूमी - 28-Mar, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत काल शनिवारी घट झाल्यानंतर पुन्हा आज रविवारी वाढ होऊन एकूण रुग्ण संख्येत 1228 कोरोना बाधितांची भर पडली होती.
रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा 1228 एवढा आहे. कोरोना बाधितांचा आकडा कालच्या पेक्षा अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दिवसेंदिवस वाढणार्या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 354 आढळली असून त्याखालोल राहाता 126, कोपरगाव 89, संगमनेर 84, राहुरी 82, श्रीरामपूर 79, कर्जत 59, नेवासा 52, जामखेड 47, अकोले 39, पाथर्डी 39, नगर ग्रामीण 37, पारनेर 35, श्रीगोंदा 33, कन्टेन्मेंट बोर्ड 29, शेवगाव 22 व इतर जिल्हा 22 असे रुग्ण आढळले.
आज रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 257, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 599 आणि अँटीजेन चाचणीत 372 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 102, राहाता 38, कोपरगाव 37, राहुरी 02, श्रीरामपूर 02, कर्जत 13, नेवासा 12, अकोले 03, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 08, पारनेर 04, श्रीगोंदा 13, कन्टेंमेंट बोर्ड 22 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 221, राहाता 74, कोपरगाव 52, संगमनेर 67, राहुरी 18, श्रीरामपूर 54, कर्जत 04, नेवासा 12, जामखेड 02, अकोले 12, पाथर्डी 05, नगर ग्रामीण 23, पारनेर 14, श्रीगोंदा 10, कन्टेंमेंट बोर्ड 07, इतर जिल्हा 18, शेवगाव 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 372 जण बाधित आढळुन आले. मनपा मनपा 31, राहाता 14, संगमनेर 17, राहुरी 62, श्रीरामपूर 23, कर्जत 42, नेवासा 28, जामखेड 24, अकोले 24, पाथर्डी 33, नगर ग्रामीण 06, पारनेर 17, श्रीगोंदा 10, इतर जिल्हा 04, शेवगाव 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे तसेच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments