जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश
अहमदनगर । वीरभूमी- 29-Mar, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्हयात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्यासाठी अहमदनगर जिल्हयातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज दिले.
याबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, साथरोग अधिनियम 1897 कलम 2 (1) नुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात निर्बंध शिथील व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उघडणे (मिशन बिगीन अगेन) संदर्भातील मार्गदर्शक सूचनांची दि.15/04/2021 पर्यत अंमलबजावणी करणेबाबत आदेशीत केलेले आहे. संदर्भ क्र. 8 अन्वये अहमदनगर जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक आदेश लागू करणेत आलेले आहेत.
ज्याअर्थी, अहमदनगर जिल्हयात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देणेकामी अहमदनगर जिल्हयातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अहमदनगर जिल्हयात कोरोना विषाणू (कोविड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हयातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा दिनांक 30/03/2021 पासून दिनांक 30/04/2021 पर्यत बंद ठेवणेबाबत या आदेशाव्दारे आदेशित करीत आहे.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते सायरोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
Hi