बोधेगाव । वीरभूमी - 30-Mar, 2021, 12:00 AM
शेवगाव तालूक्यातील बोधेगाव येथील श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन घेण्यात आली.
यावेळी अनेक सभासदांनी कारखान्याचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे नाव कारखान्याला देण्यात यावे अशी मागणी केली.
त्यामुळे संचालक माधव काटे यांनी "संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना" असे कारखान्याचे नामकरण करण्यात यावे असा ठराव मांडला. त्याला सर्व सभासदांनी मान्यता दिलीआणि ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी सभेच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे म्हणाले की, हा कारखाना ऊसतोडणी कामगारांचा आहे. कारखाना उभारतांना आदरणीय बबनरावजी ढाकणे साहेबांना प्रचंड संघर्ष करावा लागला.
केदारेश्वरच्या कार्यक्षेत्रातील सुकळी, गोळेगाव, नागलवाडी, शेकटे, आणि लाडजळगाव परिसरात मागील आठवडयात वादळी वाऱ्यासह गारपीट होवून, गहू, कांदा, हरबरा, ऊस इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त सभासदास प्रत्येकी चार हजार रूपयाची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
शेतकी विभागास प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल देण्याच्या सुचना केल्या.अहवाल येताच येत्या दोन दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेश देण्यात येणार आहेत.
ऊसतोडणी कामगारांचा आणीअडचणीत असणारा केदारेश्वर शेतकऱ्यांचे आस्त्रू पुसू शकतो तर मग जिल्ह्यातील इतर कारखाने तर बागायतदारांचे आहेत. आर्थिक दृष्टया सक्षम आहेत ते का शेतकऱ्यांची मदत करीत नाहीत असा सवाल ढाकणे यांनी केला.
३१ जानेवारीपर्यंत आलेल्या ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. प्रत्येक महिण्याच्या चार तारखेल कामगारांचे पगार खात्यावर जमा केले जातात.
बँकेचे हाप्ते वेळेवर भरीत आहोत. त्यामुळे आता पर्यंत केदारेश्वर वर प्रचंड संकटे आली . तरी कारखाना विकला नाही. आणि कितीही मोठे संकट आले तरी विकणार नाही, हा विश्वास पुन्हा एकदा त्यांनी सभासदांना दिला.
प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी नोटीस वाचन केले. तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनी कूमार घोळवे, जेष्ठ संचालक सुरेश होळकर, घोडके, तुषार वैदय, भागवत गुरुजी, खेडकर आण्णा यांनी आपले विचार मांडले.
सभेसाठी जेष्ट संचालक भाऊसाहेब मुंढे बाबा, सतिष गव्हाणे, तज्ञ संचालक मयुर हुंडेकरी, मुख्य लेखापाल तीर्थराज घुंगरड, शेतकी आधिकारी अभिमान विखे, मुख्य प्रशासन आधिकारी पोपट केदार, मुख्य रसायन तज्ञ के.डी. गर्जे, मुख्य अभियंता राजेंद्र अंधारे मुख्य कर्तव्य आधिकारी राजेंद्र दराडे, आंबादास दहिफळे, भगवान सोनवणे, इत्यादी उपस्थीत होते.
आभार व्हाईस चेअरमन डॉ.प्रकाश घनवट यांनी मानले तर सुत्रसंचालन शरद सोनवणे, यांनी केले
Comments