अहमदनगर । वीरभूमी- 31-Mar, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या निवदेंदिवस वाढत चालली असून आज बुधवारी गेल्या चोवीस तासात तब्बल 1680 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेतील ही सर्वात मोठी आकडेवारी असून जिल्ह्यातील कोरोनाचा धोका वाढला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात रविवारपासून संचारबंदी, सोमवार पासून जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद करण्यात आले. विवाह सोहळ्यांनाही परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश काढले. तर मंगळवार पासून 10 वी व 12 वी वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना रोखण्यासाठी विविध उपययोजना करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जावू नये, कोरोना नियमांचे पालन केले तर कोरोना रोखू शकतो. यामुळे नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
आज बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्ह्यात 1680 कोरोना बाधित रुग्णांची एकूण रुग्ण संख्येत भर पडली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 677, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 514 आणि अँटीजेन चाचणीत 489 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 264, राहाता 93, श्रीरामपूर 49, कोपरगाव 01, संगमनेर 47, कर्जत 20, राहुरी 19, नगर ग्रामीण 25, पाथर्डी 02, अकोले 42, पारनेर 33, नेवासा 10, जामखेड 29, श्रीगोंदा 19, कन्टेन्मेंट बोर्ड 09, मिलट्री हॉस्पिटल 14, इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 143, राहाता 103, श्रीरामपूर 44, कोपरगाव 71, संगमनेर 55, कर्जत 02, राहुरी 17, नगर ग्रामीण 18, पाथर्डी 05, अकोले 05, शेवगाव 04, पारनेर 14, नेवासा 08, जामखेड 02, श्रीगोंदा 09, कन्टेन्मेंट बोर्ड 03, इतर जिल्हा 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 489 जण बाधित आढळुन आले. मनपा 26, राहाता 33, श्रीरामपूर 23, कोपरगाव 42, संगमनेर 03, कर्जत 79, राहुरी 56, नगर ग्रामीण 31, पाथर्डी 56, अकोले 11, शेवगाव 57, पारनेर 13, नेवासा 37, जामखेड 06, श्रीगोंदा 09, कन्टेन्मेंट बोर्ड 04, इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
GAjquXksdPTWOZ