आरोग्य मंत्र्यांची घोषणा । महाराष्ट्रात आता फक्त 500 रुपयात चाचणी
मुंबई : 31-Mar, 2021, 12:00 AM
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्या कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने कपात केली असून चाचणी दर आणखी स्वस्त झाले आहेत.
यामुळे सर्वसामान्यांनाही आता कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी कमी खर्चात करता येणार आहे.
सरकारने जारी केलेल्या सुधारित दराप्रमाणे आता कोरोना निदानासाठी करण्यात येणार्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे.
याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत.
अँटीजेन टेस्टसाठी 150 रुपये करण्यात येणार आहेत. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी ही घोषणा केली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्या कोरोना चाचणीचे दर नियंत्रित केले आहेत. आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली.
त्यामुळे हे दर 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार 500 रुपयांपर्यंत खाली आलेत.
आता खासगी प्रयोगशाळांना 500 रुपयात ही चाचणी करणं बंधनकारक असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.
chWTozBJAMC