अहमदनगर । वीरभूमी - 01-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंता व्यक्त करणारा आहे. मात्र आज गुरुवारी बुधवारच्या तुलनेत कमी आहे.
यामुळे एकप्रकारे दिलासा मिळत आहे. मात्र आज गुरुवारी आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा 1319 एवढा असल्याने चिंता व्यक्त केली आहेत.
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक गोष्टीवर निर्बंध आणले आहेत. मात्र लोक नियमाचे पालन करत नसल्याने कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे वाढता कोरोना बाधितांचा आकडा हा कडक निर्बंधाकडे घेऊन जाणारा ठरत आहे.
आज सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात असून ती 362 एवढी आहे. त्या खालोखाल कोपरगाव 144, नेवासा 100, श्रीरामपूर 91, पाथर्डी 65, संगमनेर 64, अकोले 63, राहाता 63, शेवगाव 53, राहुरी 51, कर्जत 50, श्रीगोंदा 34, जामखेड 32 व इतर तालुक्यांचाही आकडा अशाचप्रमाणे आहे.
आज गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 447, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 400 आणि अँटीजेन चाचणीत 472 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 188, नेवासा 11, श्रीरामपूर 20, पाथर्डी 23, संगमनेर 48, अकोले 36, राहाता 02, नगर ग्रामीण 26, शेवगाव 09, कर्जत 05, कन्टेंन्मेंट बोर्ड 23, श्रीगोंदा 07, जामखेड 29, पारनेर 17, इतर जिल्हा 01, मिलट्री हॉस्पिटल 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 137, कोपरगाव 44, नेवासा 14, श्रीरामपूर 44, पाथर्डी 08, संगमनेर 10, अकोले 01, राहाता 51, नगर ग्रामीण 12, शेवगाव 13, राहुरी 22, कर्जत 03, कन्टेंन्मेंट बोर्ड 06, श्रीगोंदा 10, जामखेड 03, पारनेर 07, इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 472 जण बाधित आढळुन आले. मनपा 37, कोपरगाव 100, नेवासा 75, श्रीरामपूर 27, पाथर्डी 34, संगमनेर 06, अकोले 26, राहाता 10, नगर ग्रामीण 20, शेवगाव 31, राहुरी 29, कर्जत 42, कन्टेंन्मेंट बोर्ड 10, श्रीगोंदा 17, पारनेर 04, इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
IcdHOuzZLDjBYnxW