या महाविद्यालयाने अशक्य काम शक्य करून दाखविले
जळीतानंतर 21 दिवसात उभी केली अद्ययावत कॉम्प्युटर लॅब । माजीमंत्री पिचड यांचेकडून कौतूक
अकोले । वीरभूमी- 01-Apr, 2021, 12:00 AM
अगस्ति महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळेच्या इमारतीला आग लागल्याचा मागमूसही आता दिसत नसून संस्थेच्या कार्यकारिणीसह प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी यांनी कष्ट घेऊन अशक्य काम शक्य करुन दाखविले. खर्या अर्थाने कामातूनच विरोधकांना उत्तर दिले, असे गौरवोद्गार अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी काढले.येथील अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील नूतन संगणकशास्त्र प्रयोगशाळेचे उद्घाटन माजीमंत्री पिचड यांचे उपस्थितीत झाले, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला योगी केशवबाबा, संस्थेचे कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड, ह.भ.प. दीपक महाराज देशमुख, ह.भ.प. विवेक महाराज केदार, गिरजाजी जाधव, पुंजा पाटील आवारी, अगस्ति कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, नगरसेवक सचिन शेटे, शंभू नेहे, संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, उपाध्यक्ष मधुकरराव सोनवणे, सेक्रेटरी यशवंत आभाळे, सहसेक्रेटरी अॅड. भाऊसाहेब गोडसे,
खजिनदार एस. पी. देशमुख यांचेसह कार्यकारिणी सदस्य सुधाकरराव देशमुख, आनंदराव नवले, अरिफ तांबोळी, सौ.कल्पनाताई सुरपुरिया, राहुल बेणके यांचेसह माजी विद्यार्थी संघाचे सचिव अमोल वैद्य, तुषार सुरपुरिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, एमबीएचे संचालक डॉ.प्रशांत तांबे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.आर. डी. पल्हाडे, उपप्राचार्य डॉ. संजय ताकटे, प्रबंधक चंद्रभान ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मधुकर पिचड म्हणाले की, कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन सर्वांनी केलेल्या प्रयत्नामुळे नव्याने संगणकशास्त्र प्रयोगशाळा उभी राहिली. त्यासाठी प्रत्येकाचं योगदान महत्वाचे आहे. संस्थेची कार्यकारिणी एकजीवाने कार्यरत असून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याच्या दृष्टीने यापुढेही काम सुरु ठेवावे, असे आवाहन केले. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
योगी केशवबाबा यांनी महाविद्यालय आपलं सर्वांचं आहे, असे सांगतानाच सुखदु:खात सर्वांनी सहभागी व्हावे. कोणतेही चांगले काम करत असताना अफवांचा फार विचार करु नये, असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे यांचे कौतुक करताना संगणक प्रयोगशाळेचे काम 21 दिवसात पूर्ण करण्याचे अशक्य काम त्यांनी पूर्ण केल्याचे सांगितले. माजी मंत्री पिचड यांनी व्यक्तीगत हित न पाहता जे केले ते जनतेसाठी केले असेही ते यावेळी म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे पाटील यांनी सांगितले की, संगणकशास्त्र प्रयोगशाळेला आग लागल्याचा प्रसंग अतिशय वेदनादायी होता. परंतु विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ न देण्यासाठी 21 दिवसात नूतन संगणकशास्त्र प्रयोगशाळा उभी केल्याचे सांगितले. भविष्याचा वेध घेताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला महत्व देणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.
प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, नुतन संगणकशास्त्र प्रयोगशाळेसाठी योगदान देणार्या प्रत्येकाचे आभार मानले.
माजी विद्यार्थी संघाने निधी संकलन करुन या चांगल्या कामासाठी योगदान दिले असे ते म्हणाले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे सचिव अमोल वैद्य तसेच लॅब उभारणीसाठी वेळेत संगणक संच व युपीएस उपलब्ध करुन देणार्या बाळासाहेब आंबरे, श्री.अरगडे यांचा सत्कार करण्यात आला. आभार संस्थेचे सदस्य अरिफ तांबोळी यांनी मानले.
Comments