अहमदनगर । वीरभूमी- 01-Apr, 2021, 12:00 AM
दि. 7 ऑगस्ट 2019 रोजी शेवगाव येथील आयटीआय परिसरात अनैतिक संबधातून बाबपुसाहेब घनवट याची हत्या करण्यात आली होती.
घनवट याच्या हत्येप्रकरणी शेवगाव पोलिसांनी आरोपी पुनमसिंग भोंड (मयत), कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे (तिघेही रा.रामनगर, शेवगाव, ता. शेवगाव) यांना अटक केली होती. या तीनही आरोपींवर खटला दाखल करण्यात आला होता.
या तीनही आरोपींना जिल्हा न्यायाधीश (क्र. 1) अशोककुमार भिलारे यांनी बाबपुसाहेब घनवट याच्या हत्येप्रकरणी दोषी धरून आरोपी कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे यांना जन्मठेप व प्रत्येकी 11 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 7 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली असल्याची माहिती अतिरीक्त सरकारी वकील अनिल सरोदे सरोदे यांनी दिली.
सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, दि.7 ऑगस्ट 2019 रोजी शेवगाव-पाथर्डी रोडवरील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयासमोर असलेल्या जामा मश्जिद ट्रस्टच्या मोकळ्या जागेवर राहत असलेल्या महिलेच्या पालावर मयत बापुसाहेब घनवट रात्री 10:30 वा.चे सुमारास गेला असता त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले आरोपी परमेश्वर पुनमसिंग भोंड, कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे यांनी बापुसाहेब घनवट याचे संबंधित त्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून त्याला मारहाण करून, त्याचे तोंड दाबुन झोपडी पाठीमागील गवतात ओढत घेवुन जावुन मोठया लोखंडी खिळयाने चेहर्यावर वार करून ठार मारले.
दुसर्या दिवशी सकाळी सदर घटनेबाबत मयताचे भाऊ काकासाहेब एकनाथ घनवट याने शेवगाव पोलीस स्टेशनला अज्ञान इसमांविरूध्द फिर्याद दाखल केली होती. त्यावरून अज्ञात इसमांविरूध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास शेवगाव पोलिसांनी करून तपासामध्ये आरोपींचा सहभाग असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे आरोपींविरुध्द तपास पूर्ण झाल्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्याचे सपोनि. सुजित ठाकरे यांनी आरोपींविरूध्द मा. न्यायालयात भा.दं.वि. कलम 302, 201, 506 सह 34 अन्वये दोषारोपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे साहेब यांचे न्यायालयात झाली.
केसचा निकाल लागेपावेतो तिन्ही आरोपी जेलमध्येच होते. केसचा निकाल होण्यापुर्वी आरोपी पुनमसिंग भोंड याचा जेलमध्ये आजारी पडुन मृत्यू झाला होता. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण 08 साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयासमोर आलेला परिस्थतीजन्य पुरावा व अतिरीक्त सरकारी वकील अनिल दि. सरोदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायालयाने आरोपींना दोषी धरून उर्वरित आरोपी कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे (दोघे रा. रामनगर, शेवगाव) या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी 11 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 7 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. एम. ए. थोरात यांनी अतिरीक्त सरकारी वकील अनिल सरोदे यांना खटल्याचे कामी मदत केली.
afdQnpLWmI