परीक्षेच्या तोंडावर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई : 02-Apr, 2021, 12:00 AM
राज्यात 23 एप्रिलपासून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. मात्र या ऑफलाईन परिक्षांना दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, वर्षभर शिक्षण ऑनलाईन केले मग आता परीक्षा ऑनलाईन का? असा प्रश्न उपस्थित करत मुंबईत शिवाजी पार्कवर आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलन करणार्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यायला विरोध केला आहे. वर्षभर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतले आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
या मागणीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थांनी एकत्र येऊन शिवाजी पार्क येथे आंदोलन केले आहे.
राज्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहता राज्य सरकार दहावी-बारावी ऑफलाईन परीक्षेबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहीले आहे.
iYPbqUcJKz