अहमदनगर । वीरभूमी - 04-Apr, 2021, 12:00 AM
दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना आज आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या शनिवारच्या तुलनेत घटली आहे.
आज जिल्ह्यात दुपारी 2.30 वाजेपर्यंत 1617 कोरोना बाधित आढळले. मात्र धोका कायम असून नागरिकांनी काळजी घ्यावी.
दिवसेंदिवस वाढणार्या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दोन दिवसापुर्वी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी कडक निर्बंध अगर लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यातील शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 491, राहाता 190, राहुरी 126, श्रीरामपूर 105, नगर ग्रामीण 98, संगमनेर 98, कर्जत 97, कोपरगाव 77, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड - 61, पाथर्डी 52, नेवासा 51, श्रीगोंदा 45, अकोले 39, पारनेर 31, शेवगाव 27, इतर जिल्हा 20, जामखेड 08, इतर राज्य 1 असे एकूण रुग्ण आढळले आहेत.
आज रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 458, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 619 आणि अँटीजेन चाचणीत 540 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 285, राहाता 26, राहुरी 08, श्रीरामपूर 28, नगर ग्रामीण 31, संगमनेर 04, कर्जत 02, कोपरगाव 01, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड - 35, पाथर्डी 03, नेवासा 03, अकोले 11, पारनेर 16, शेवगाव 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 141, राहाता 127, राहुरी 27, श्रीरामपूर 53, नगर ग्रामीण 17, संगमनेर 94, कर्जत 03, कोपरगाव 62, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड - 06, पाथर्डी 04, नेवासा 15, श्रीगोंदा 12, अकोले 22, पारनेर 07, शेवगाव 04, इतर जिल्हा 19, जामखेड 05, इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 540 जण बाधित आढळुन आले. मनपा 65, राहाता 37, राहुरी 91, श्रीरामपूर 24, नगर ग्रामीण 50, कर्जत 92, कोपरगाव 14, भिंगार कन्टेन्मेंट बोर्ड - 20, पाथर्डी 45, नेवासा 33, श्रीगोंदा 33, अकोले 06, पारनेर 08, शेवगाव 18, इतर जिल्हा 01, जामखेड 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
NytKegrQpTzJF