मनसेचे ट्वीट द्वारे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई । वीरभूमी- 04-Apr, 2021, 12:00 AM
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. असे झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य कराव, असे आवाहन मनसेच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबतचे आवाहन करणारी पोस्ट मनसे अधिकृत या ट्वीटर अकाऊंटवर टाकण्यात आली आहे.
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधून निर्णय घेण्याआधी लॉकडाऊनवर काय उपाय असला तर सुचवा, असे आवाहन केले होते. या आवाहनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तज्ञांशी चर्चा केली. राज्यातील व्यापारी, चित्रपट क्षेतातील मान्यवर, राजकीय नेते अशा विविध क्षेत्रातील संबधितांशी संपर्क करून त्यांचे मते जाणून घेतली.
त्याप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी देखील फोन करून चर्चा केली. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोनवरील संवादात केलं होत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संवादानंतर मनसेने आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत एक पोस्ट आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकली आहे.
यामध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना फोनवरील संवादात केलं.
‘आपण सर्वांनी सरकारी सूचनांचं पालन करावं, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं’ असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे.
या आवाहनामुळे राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या रोखण्यासाठी मनसेनेही शासनाने लॉकडाऊन केल्यास त्याला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले आहे.
lreBuXNsanSw