अधिकार्यांनो मुख्यालय सोडू नका ः जिल्हाधिकार्यांचे आदेश
अहमदनगर । वीरभूमी- 04-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविणेकामी तसेच आपत्कालिन यंणांना आवश्यकतेनुसार मदतीस उपलब्ध राणेकामी जिल्ह्यातील सर्व अधिकारी अथवा कर्मचारी यांना त्यांचे मुख्यालयाचे ठिकाणी उपस्थित राहावे.
तसेच जिल्हाधिकारी यांचे परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यात येत आहेत.
या उपाय योजनांचे नियोजन समन्वयन आणि अंमलबजावणी करणेसाठी तातडीने अधिकारी अथवा कर्मचारी यांची गरज भासू शकते. तसेच कोरोना आपत्कालिन परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध होणेकामी सर्वांनी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये. या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
dARqVmlukKPvF