अहमदनगर । वीरभूमी - 07-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीने काल मंगळवारी रेकॉर्ड केल्यानंतर आज घट झाली आहे. आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात 1652 कोरोना बाधित आढळून आहे.
लॉकडाऊनच्या दुसर्या दिवशीच कोरोना बाधितांची संख्या घटल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र हा आकडा 1652 असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू.
वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी आज 362 वर आली आहे. मात्र दुसर्या क्रमांकावर कर्जतने उडी मारत 166 चा आकडा गाठला आहे. त्या खालोखाल राहाता 146, नगर ग्रामीण 134, कोपरगाव 99, राहुरी 97, पाथर्डी 88, संगमनेर 84, शेवगाव 84, श्रीरामपूर 70, अकोले 68, नेवासा 65, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 62, जामखेड 46, इतर जिल्हा 36, पारनेर 28, श्रीगोंदा 11, मिलट्री हॉस्पिटल 05 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 458, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 492 आणि अँटीजेन चाचणीत 702 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 141, कर्जत 11, राहाता 27, नगर ग्रामीण 22, कोपरगाव 35, राहुरी 11, पाथर्डी 24, संगमनेर 53, शेवगाव 32, श्रीरामपूर 09, अकोले 13, नेवासा 03, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 44, जामखेड 16, इतर जिल्हा 04, पारनेर 07, श्रीगोंदा 01, मिलट्री हॉस्पिटल 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 155, कर्जत 04, राहाता 88, नगर ग्रामीण 35, कोपरगाव 56, राहुरी 20, पाथर्डी 01, संगमनेर 31, शेवगाव 04, श्रीरामपूर 57, अकोले 06, नेवासा 04, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 03, जामखेड 01, इतर जिल्हा 15, पारनेर 06, श्रीगोंदा 05, इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 702 जण बाधित आढळून आले. मनपा 66, कर्जत 451, राहाता 31, नगर ग्रामीण 77, कोपरगाव 08, राहुरी 66, पाथर्डी 63, शेवगाव 48, श्रीरामपूर 04, अकोले 49, नेवासा 58, भिंगार कन्टेंन्मेंट बोर्ड 15, जामखेड 29, इतर जिल्हा 17, पारनेर 15, श्रीगोंदा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
lizOLhAkQog