परभणी - 08-Apr, 2021, 12:00 AM
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राकडे प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच मराठवाड्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यातही वादळी वार्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीची कामे अपूर्ण असतील तर ती आजच पुर्ण करून घ्या, नाहीत नुकसान होण्याची शक्यता आहे.
कृषी विद्यापिठाच्या ग्रामीण हवामान सेवा केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवार दि. 9 रोजी नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे. दि. 10 रोजी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.
11 रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जालना व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.
तसेच मराठवाड्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यातही अवकाळी पाऊस होऊ शकतो. यामध्ये जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नेवासा या तालुक्याचा समावेश आहे.
यामुळे शेतकर्यांनी काढणी व मळणी केलेले पीक ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवावे. तसेच बर्याच शेतकर्यांना ज्वारी काढणी केल्यानंतर कडबा गोळा केलेला नाही तो लवकरात लवकर गोळा करून सुरक्षित ठिकाणी साठवावा.
विजा व पाऊस सुरू असताना शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा सल्ला केंद्राच्या वतीने देण्यात आला आहे.
Comments