निमगाव डाकू शिवारात घडली घटना
कर्जत । वीरभूमी- 08-Apr, 2021, 12:00 AM
अहमदनगर- सोलापूर महामार्गावर सोलापुरच्या दिशेने जाणारा कापसाचा ट्रक (टीएन-28, एवाय-1589) हा दि.8 रोजी दुपारच्यावेळी निमगाव डाकू गावाजवळ आला असता त्याने अचानक पेट घेतला. अचानक लागलेल्या आगीत कापसासह ट्रक जळून भस्मसात झाला.
आग लागलेल्या ट्रकमध्ये असलेला सात लाख 75 हजार रुपये किंमतीचा सुमारे साडे पंधरा टन कापूस व ट्रक असा सुमारे 17 लाख 75 हजाराचा ऐवज जळून खाक झाला.
महामार्ग असल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस आणि कर्जत नगरपंचायतच्या अग्नीशामक बंबाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
सदर ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बबन दहिफळे, वैभव सुपेकर, गोरख जाधव, चालक शकील बेग यांच्यासह अग्निशामक बंबचे कर्मचारी यांनी भेट देऊन आग आटोक्यात आणली, ठप्प झालेली वाहतूक सुरू केली. कर्जत नगर पंचायतचे फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी दाखल होवून आग आटोक्यात आणली.
आग एवढी मोठी होती की, अग्निशामक बंब गाडीतील पाणी संपले तरी आग आटोक्यात आली नव्हती. पाणी भरण्यासाठी वीज नव्हती. तात्काळ वीज वितरणचे श्री. घुले यांना फोन करून वीज सुरू करण्यास सांगितले.
वीज आल्यानंतर बंबात पाणी भरून आग विझवण्यात आली. मा तो पर्यंय कापसाची राख तर ट्रकचा कोळसा झाला होता.
Comments