शेवगाव तालुक्यात आज आढळले 35 कोरोना बाधित
शेवगाव । वीरभूमी- 08-Apr, 2021, 12:00 AM
दिवसेंदिवस शेवगाव शहर व तालुक्यातील कोरोना बाधिताची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासन विविध उपाय योजना करण्यात येत आहे.
कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची घरी जावून अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. आज शेवगाव, ढोरजळगाव व बोधेगाव येथील तपासणी केंद्रावर केलेल्या तपासण्यात 35 कोरोना बाधित आढळून आले.
शेवगाव शहर व तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासन सर्वतोपरी उपाय योजना करत आहे. तहसीलदार अर्चना पागिरे व त्यांचे सहकारी रात्रंदिवस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करतात, नियम मोडणार्यांना दंडात्मक शिक्षा देत शासन करतात.
वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यात शेवगाव, बोधेगाव व ढोरजळगाव येथे अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. आज गुरुवारी करण्यात आलेल्या अँटीजेन चाचणीमध्ये शेवगाव केंद्रावर 23, बोधेगाव केंद्रावर 09 व ढोरजळगाव केंद्रावर 3 असे एकूण 35 कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली आहे.
नागरिकांनी काही लक्षणे आढळल्या आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क लावावा, हात सॅनिटायझरचा वापर करावा.
सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
nToecjVDLxBXt