पिकअप पलटी झाल्याने अनेक पिल्लांचा मृत्यू
संगमनेर । वीरभूमी- 10-Apr, 2021, 12:00 AM
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कोंबड्याची पिल्ले घेवून जाणारी पिकअप पलटी झाली. ही घटना शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली. यामध्ये अनेक पिल्लांचा मृत्यू झाला आहे.
पिकअप हिच्यावरील चालक हा पुणे येथून पिकअपमध्ये कोंबड्यांची पिल्ले घेवून संगमनेरकडे जात होता. पिकअप गुंजाळवाडी शिवारात आली असता त्याच दरम्यान रस्त्याच्या दुभाजकाला धडकून हा अपघात झाला.
अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला असून महामार्गावर कोंबड्यांची पिल्ले मोठ्याप्रमाणात पडली होती. यामध्ये अनेक पिल्लांचा मृत्यू झाला आहे.
डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, मनेष शिंदे, अरविंद गिरी, योगीराज सोणवने यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर अपघातग्रस्त वाहन टोल नाक्याचे क्रेनने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत चालू केली आहे.
Comments