अमृता फडणवीस यांनी चेहर्याला डाग असलेला फोटो शेअर करत असं का म्हटलंय
वीरभूमी । प्रतिनिधी- 10-Apr, 2021, 12:00 AM
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर चेहर्याला डाग असलेला फोटो शेअर करत ‘सिर्फ कुछ डाग अच्छे लगते है!’ असे म्हटले आहे.
आता असं म्हणण्याचे कारणही त्यांनी दिले आहे. ते कारण म्हणजे आज अमृता फडणवीस यांचा वाढदिवस असून त्यांनी ‘वाढदिवसाच्या आपल्या सर्व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहे.
अमृत फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांनी चेहर्याला केक लावलेला फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. त्याचबरोबर ‘सिर्फ कुछ डाग अच्छे लगते है!’ अशी टॅगलाईन टाकली आहे.
असा फोटो ट्विटरवर टाकल्यानंतर अनेकांनी अमृता फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.
आता या ट्रोल करणारांना अमृता फडणवीस या काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागुन राहीले आहे.
svGrNTgF