अहमदनगर । वीरभूमी - 17-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून चिंता व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी जिल्ह्यात 3280 कोरोना बाधित आढळले असून नागरिकांच्या बेफिकीरीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
आज शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी व खाजगी प्रयोगशाळेतील तपासणीपेक्षा अँटीजेन चाचणीतील बाधितांची संख्या जास्त आहे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर कोरोना रोखू शकतो. यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 887 वर गेला असून नगर ग्रामीण 341, राहाता 280, कर्जत 236, श्रीरामपूर 189, राहुरी 186, संगमनेर 184, शेवगाव 164, कोपरगाव 152, अकोले 137, पारनेर 101, पाथर्डी 98, नेवासा 95, भिंगार कन्टेंन्मेंट 68, इतर जिल्हा 55, जामखेड 48, श्रीगोंदा 46, मिलटरी हॉस्पिटल 13 असे रुग्ण आढळले आहेत.
आज शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत 3280 ने भर पडली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 798, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 808 आणि अँटीजेन चाचणीत 1674 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 214, नगर ग्रामीण 40, राहाता 79, कर्जत 44, श्रीरामपूर 41, राहुरी 26, संगमनेर 50, शेवगाव 89, कोपरगाव 10, अकोले 61, पारनेर 26, पाथर्डी 21, नेवासा 26, भिंगार कन्टेंन्मेंट 41, इतर जिल्हा 04, जामखेड 02, श्रीगोंदा 11, मिलटरी हॉस्पिटल 13 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 379, नगर ग्रामीण 42, राहाता 86, कर्जत 07, श्रीरामपूर 65, राहुरी 15, संगमनेर 73, शेवगाव 13, कोपरगाव 31, अकोले 06, पारनेर 09, पाथर्डी 10, नेवासा 08, भिंगार कन्टेंन्मेंट 13, इतर जिल्हा 37, जामखेड 07, श्रीगोंदा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1674 जण बाधित आढळून आले. मनपा 294, नगर ग्रामीण 259, राहाता 115, कर्जत 185, श्रीरामपूर 83, राहुरी 145, संगमनेर 61, शेवगाव 62, कोपरगाव 111, अकोले 70, पारनेर 66, पाथर्डी 67, नेवासा 61, भिंगार कन्टेंन्मेंट 14, इतर जिल्हा 14, जामखेड 39, श्रीगोंदा 28 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नियमाचे पालन करून विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments