पालमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन । होम आयसोलेशन पूर्णपणे बंद
अहमदनगर । वीरभूमी- 17-Apr, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी 14 दिवस जनता कर्फ्यु पाळावा, असे आवाहन पालमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना बाधितांची परिस्थिती, उपाचर व लसीकरण याबाबतची माहिती घेतली.
या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह आ. रोहित पवार, आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी 14 दिवस जनता कर्फ्यु पाळावा, असे आवाहन करत जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करणार असल्याचे सांगितले.
तसेच होम आयसोलशन पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकारी नवीन आदेश काढणार असल्याचे पालमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
aYvNQHOe