पाथर्डीत दुकानदाराला दहा हजाराचा दंड
पाथर्डी । वीरभूमी - 18-Apr, 2021, 12:00 AM
लॉकडाऊन काळात दुकान उघडून ग्राहकास माल देणे, दुकानदाराला चांगलेचं महागात पडले आहे. संबंधित दुकानदाराला नगर परिषदच्या पथकाने ग्राहकाला माल देतांना रंगेहाथ पकडून दहा हजाराचा दंड ठोकल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान नियम मोडणार्यांच्या विरोधात पाथर्डी नगर परिषदेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे.
लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन करणार्या पाथर्डी शहरातील 15 दुकानदारांकडून प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे 15 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शेवगाव रोडवरील, बस स्थानकाच्या समोरील जयभवानी स्टील ट्रेडर्स या दुकानदाराला नगर परिषदच्या पथकाने, ग्राहकाला दुकानातील माल देतांना रंगेहाथ पकडले असता त्याच्यावर दंडात्मक कारवाई करुन 10 हजाराचा दंड वसूल केला.
तर शहरात विना मास्क फिरणार्या 150 जणांकडून प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे दंड आकारात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख गौरव आदिक, कर व प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण हाडके, ज्ञानूसिंग परदेशी, रविंद्र बर्डे, नंदलाल गोला, रशिद शेख, अनिल दिनकर, अनिल कोळसे, जावेद शेख यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नगर परिषदेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने नियम मोडणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments