श्रीगोंदा । वीरभूमी- 18-Apr, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यात रविवार दि.18 रोजी कोरोना उपचार चालू असताना 3 जणांचा मृत्यू झाला. तर नव्याने 110 जण कोरोना संक्रमित आढळले. यामध्ये 41 महिला व 69 पुरुषांचा समावेश आहे.
श्रीगोंदा तालुक्यात घेण्यात आलेल्या 272 रॅपिड अँटीजन चाचण्यात 75 तर आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालात 35 कोरोना बाधित आढळून आले. 38 जणांच्या घशातील स्राव घेऊन ते नगर जिल्हारुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.
आत्तापर्यंत तालुक्यातील एकूण बधितांची संख्या 4 हजार 843 झाली आहे. तर आतापर्यंत 56 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
सद्यस्थितीला 744 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी कोविड केंद्रात 109, ग्रामीण रुग्णालयात 33, खाजगी हॉस्पिटलमध्ये 292 तर 310 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.
रविवार दि. 18 रोजी आढळलेल्या रुग्णांमध्ये श्रीगोंदा शहरात 22 तर ग्रामीण भागातील काष्टी-22, कोळगाव-6, भानगाव-5, पारगाव सुद्रीक-5, मढेवडगाव-4, आढळगाव-4, कौठा-4, घारगाव-3, जंगलेवाडी-3, तांदळी दुमाला-3, मांडवगण-2, ढोरजा-2, मुंगूसगाव-2, देऊळगाव-2, लोणी व्यंकनाथ-2, वेळू-2, देवदैठण-2, निंबवी-2, निमगाव खलू-2, घोटवी-2 आढळले आहेत.
तर कणसेवाडी, हिरडगाव, बेलवंडी कोठार, वांगदरी, गणेशा, माठ, इनामगाव, रूईखेल, म्हसे, पिंपळगाव पिसा, उक्कडगाव, अधोरेवाडी, घोगरगाव, विसापूर, वडाळी, चिखलठाणवाडी, पिसोरेखांड येथे प्रत्येकी एक रुग्ण असे कोरोना बाधित आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
Comments