अहमदनगर । वीरभूमी - 19-Apr, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतांनाही बेजबाबदारपणामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज सोमवार नगर जिल्ह्यात 3229 कोरोना बाधित आढळले आहेत.
दिवसेंदिवस नगर जिल्ह्यातील परिस्थित कठीण बनत चालली आहे. यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेवरही कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिल्यानंतर अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवण्यात येत आहेत.
मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा बेजबाबदार नागरिकांमुळे वाढताच आहे. आज सोमवारी जिल्ह्यात 3229 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1049, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 916 तर अँटीजेन चाचणीत 1264 असे 3229 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 742 वर गेला असून संगमनेर 296, नगर ग्रामीण 255, कर्जत 213, शेवगाव 213, राहाता 207, अकोले 199, कोपरगाव 182, पारनेर 135, भिंगार कन्टेंमेंट 126, श्रीगोंदा 122, श्रीरामपूर 114, नेवासा 113, राहुरी 104, पाथर्डी 90, इतर जिल्हा 50, जामखेड 45, मिलटरी हॉस्पिटल 23 असे रुग्ण आढळले आहेत.
यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 174, संगमनेर 57, नगर ग्रामीण 59, कर्जत 77, शेवगाव 133, राहाता 67, अकोले 136, कोपरगाव 32, पारनेर 68, भिंगार कन्टेंमेंट 93, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 11, नेवासा 20, राहुरी 15, पाथर्डी 38, इतर जिल्हा 02, जामखेड 26, मिलटरी हॉस्पिटल 23 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 312, संगमनेर 185, नगर ग्रामीण 54, कर्जत 17, शेवगाव 11, राहाता 91, अकोले 31, कोपरगाव 19, पारनेर 06, भिंगार कन्टेंमेंट 28, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 55, नेवासा 31, राहुरी 23, पाथर्डी 08, इतर जिल्हा 34, जामखेड 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1264 जण बाधित आढळून आले. मनपा 256, संगमनेर 54, नगर ग्रामीण 142, कर्जत 119, शेवगाव 69, राहाता 49, अकोले 32, कोपरगाव 131, पारनेर 61, भिंगार कन्टेंमेंट 05, श्रीगोंदा 96, श्रीरामपूर 48, नेवासा 62, राहुरी 66, पाथर्डी 44, इतर जिल्हा 14, जामखेड 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments