कोरोना उपचाराच्या अडचणीबाबत जिल्हाधिकार्यांकडून फोन क्रमांक जाहीर
अहमदनगर । वीरभूमी- 19-Apr, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांना येणार्या अडीअडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना रेमडीसिवीर, ऑक्सिजन, बेड आदीची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष 0241- 2343600, रेमडीसिवीर औषधी माहिती कक्ष 0214- 2322432 व बेड व्यवस्थापन माहिती कक्ष 0241- 2345460 असे ती क्रमांक जाहीर केले आहेत.
शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशानुसार रेमडीसिवीर व ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यामध्ये दैनदिन 5500 ते 6000 रेमडीसिवीर औषधाची मागणी नोंदवण्यात येते. परंतू मागणीच्या उनषंगाने पुरवठा अगदी नगण्य आहे. रेमडीसिवीर औषधांच्या चौकशीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यासाठी एकूण लिक्विड ऑक्सिजन आवश्यकता 60 मेट्रीक टन एवढी मागणी आहे. मात्र ऑक्सिजनची मागणी व होणारा पुरवठा यामध्ये तफावत असल्याने जिल्ह्यातील रुग्णांलयाकडून ऑक्सिजन मागणी होत असते. प्राप्त ऑक्सिजनचे जिल्हास्तरीय पथका मार्फत वितरण करण्यात येत असून वितरीत करण्यात येणारा ऑक्सिजन उक्त वैद्यकिय वापरासाठी पुरविण्यात येत आहे.
कोरोना संदर्भात नागरिकांना येणार्या अडचणी संदर्भात वरील नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर चौकशी करावी, असे आवाहन केले आहे.
ESUbLdAuKnxk