रामनवमी विशेष ः कोरोनामुक्तीचा संदेश देणारे श्रीराम
शेवगाव । वीरभूमी- 20-Apr, 2021, 12:00 AM
सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार घातला आहे. अनेक कोरोना बाधितांना वेळेवर उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. शासनाने कडक निर्बंध घालून दिले, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
उद्या बुधवार दि. 21 एप्रिल रोजी रामनवमी उत्सह असून तो सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात करण्यात येतो. मात्र मागील वर्षीपासून कोरोना संसर्गामुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जातो.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शेवगावचे चित्रकार शितलकुमार गोरे यांनी आपल्या कल्पनेतून सुंदर असे श्रीरामाचे चित्र काढले असून यातून कोरोना मुक्तीचा संदेश दिला आहे.
श्रीरामनवमी व कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शेवगाव येथील चित्रकार शितलकुमार गोरे यांनी ‘कोरोनावरील रामबाण’ या विषयावर चित्र रेखाटून नागरीकांचे प्रबोधन केले आहे. त्यातून त्यांनी नियम पाळून कोरोना मुक्तीचा संदेश दिला आहे.
चित्रकार शितलकुमार गोरे यांनी काढलेल्या चित्रामध्ये प्रभू श्रीराम यांच्या हातात धनुष्य आहे. या धनुष्यातून श्रीराम मास्क, सॅनिटायझर, सुरक्षीत अंतर, हॅण्ड वॉश (हात स्वच्छ धुवावे) व व्यायाम असे बाण कोरोना संसर्गावर सोडतांना दाखविले आहे.
श्रीरामाने सोडलेल्या या पंच बाणातून चित्रकार शितलकुमार गोरे यांनी कोरोना मुक्तीचा संदेश देत नागरिकांना या नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
या नियमाचे सर्वांनी पालन केले तर आपण लवकर कोरोनावर विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे.
चित्रकार शितलकुमार गोरे यांनी काढलेले ‘कोरोनावरील रामबाण’ या विषयावरील चित्र कोरोना संसर्गात नागरिकांची जनजागृती करत आहे.
चित्रकार शितलकुमार गोरे हे प्रत्येक दिनविशेष, सण, उत्सव यावेळी आपल्या कल्पकतेतून चित्र काढून संदेश देत असतात.
त्यांनी दिलेला आजचा संदेशही जनाजागृती करणारा असून त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
Hello from SunDataGroup.com We are selling leads from around the world. I thought your company could benefit from it. You can visit our website www.SunDataGroup.com to see some of our data. We have a special offer running. All our databases for $99.