कोंबड्यांनी अंडे देण्याचे बंद; शेतकरी पोलिस ठाण्यात
पुणे । वीरभूमी- 21-Apr, 2021, 12:00 AM
‘पुणे तेथे काय उणे’ ही नक्कीच खरी आहे. याची प्रच्चिती वेळोवेळी येते. अशाच प्रकारे भेसळयुक्त खाद्य कोंबड्यांनी खाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यामुळे कोंबड्यांनी अंडी देण्याचे बंद केले.
यामुळे आर्थिक नुकसान झाले असून संबधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी म्हणुन शेतकर्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत पुण्यातील लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात शेतकर्याने संबधित कंपनी विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. सं!धित शेतकर्याचे नाव लक्ष्मण मुंकुंद भोंडवे (रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे आहे.
तसेच या तक्रार अर्जावर गिरीश दिगंबर चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद दत्तात्रय भोंडवे व धनंजय नारायण डांगे यांचेसह 27 जणांच्या सह्या आहेत.
या शेतकर्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, यापूर्वी याच कंपनीचे खाद्य दिले होते. त्यावेळी कोंबड्या अंडी देत होत्या. परंतू 11 एप्रिल रोजी खरेदी केलेल्या कोंबड्यांना खाद्य दिल्यानंतर 3 दिवसांनी सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले आहे.
इतर वेळी उन्हाळ्यात अंडी कमी दरात खपतात. परंतु, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे होलसेल भावात 5 रूपये 20 पैसे प्रतिअंड्याला भाव मिळत आहे. सध्या मिळणार्या दराचा विचार केला तर सुमारे जवळपास कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे संबधित कंपनीने नुकसान भरपाई द्यावी असे म्हटले आहे.
संबधित कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या खाद्याचे नमुने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.
Comments