श्रीगोंदा । वीरभूमी- 21-Apr, 2021, 12:00 AM
महामारीला सुरुवात झाल्यापासून श्रीगोंदा तालुक्यात बुधवार दि. 21 रोजी एकाच दिवशी 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. बुधवारी घेतलेल्या 501 रॅपिड अँटीजन चाचण्यात 117 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. तसेच नगर येथून आलेल्या आरटीपीसीआर चाचण्यात 17 जण पॉझिटिव्ह आले.
47 जणांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले. आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 5318 झाली आहे. तर एकूण 72 जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीला 772 रुग्ण सक्रिय आहेत. कोविड केंद्रात 207, ग्रामीण रुग्णालयात 31, खाजगी हॉस्पिटलमध्ये 493 तर 41 जण घरीच विलगिकरणात उपचार घेत आहेत.
बुधवार दि.21 रोजी श्रीगोंदा शहरात 17 जण पॉझिटिव्ह आले तर ग्रामीण भागात लोणी व्यंकनाथ-9, बेलवंडी बुद्रुक-13, पारगाव सुद्रीक-7, कोळगाव-7, काष्टी-11, अधोरेवाडी-5, भावडी-4, मुंगूसगाव-4, वडाळी-4, विसापूर-3, हंगेवाडी-3, मढेवडगाव-3, पिंपळगाव पिसा-3, शिरढोण-3, लिंपणगाव-2, गणेशा-2, मांडवगण-2, एरंडोली-2, हिरडगाव-2 असे बाधित आढळले.
तसेच घारगाव, सुरेगाव, निमगाव खलू, आनंदवाडी, चिखली, ढोकराई, गार, सांगवी, जंगलेवाडी, वडघुल, राजापूर, कोकणगाव, खांडगाव, सारोळा सोमवंशी, श्रीगोंदा कारखाना, चिंभळा व कुळधरण ता. कर्जत येथे प्रत्येकी 1 जण पॉझिटिव्ह आला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
श्रीगोंदा शहरात काल रात्रीपासून अंत्यसंस्कारांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे मुख्याधिकारी मंगेश देवरे व नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी बुधवारी याची दखल घेऊन कर्मचार्यांची संख्या वाढवली व सरस्वती नदी स्मशानभूमीसह साळवणदेवी रोड व बाबुर्डी रोड येथील स्मशानभूमी ही वापरात घेण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी एका दिवसात अकरापेक्षा जास्त मृत्यू संख्या समोर आल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. निडर व धाडसाने सामोरे जावे. औषधं उपचारांबरोबर आपले मजबूत मनोबल फार उपयुक्त आहे. या कोरोना विरुद्धच्या संघर्षात तेच जास्त प्रभावशाली आहे. आरोग्याचे सर्व नियम पाळावे.
aUgIrPxMlvSX