आमदार मोनिकाताई राजळे यांची माहिती
शेवगाव । वीरभूमी- 23-Apr, 2021, 12:00 AM
सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून शेवगाव तालुक्यातील चार रस्त्यांच्या कामांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.
लेखाशीर्ष 25-15 अंतर्गत दीड वर्षापूर्वी मंजुरी मिळाली, परंतु निधी न मिळू शकलेल्या सर्वच कामांची मागणी करण्यात आली होती. सद्यस्थितीत या चार कामांसाठी निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
या मंजूर रस्ता कामांमध्ये तालुक्यातील नागलवाडी येथील काशीकेदारेश्वर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 25 लाख रुपये,
तसेच तालुक्यातील गायकवाड जळगाव अंतर्गातील हराळवस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
त्याचप्रमाणे तालुक्यातील शेकटे खुर्द येथील काळूबाई तांडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 40 लाख रुपये व तालुक्यातील भायगाव येथील बाबुराव दुकळे वस्ती ते भातकुडगाव शिवरस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 10 लाख रुपये असा एकूण एक कोटीचा निधी या रस्ता कामांसाठी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे दि. 30 मार्च रोजीचे शासन निर्णयाप्रमाणे वरील कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.
Comments