नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच
आज आढळले 3780 कोरोना बाधित
अहमदनगर । वीरभूमी - 24-Apr, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतांनाही बेजबाबदारपणामुळे कोरोना बाधितांचा एक दिवस कमी तर एक दिवस जादा असा पाठशिवणीचा खेळ खेळत आहे. आज शनिवारी जिल्ह्यात 3780 कोरोना बाधित आढळले आहेत.जामखेड तालुक्यानेही शंभरीचा आकडा पार केला आहे. यामुळे सर्वच तालुक्यात कोरोना विस्फोट झाला आहे. नगर शहरासह नगर ग्रामीण, राहाता 300 शे पार, संगमनेर, नेवासा 200 पार तर इतर तालुके शंभरी पार आहे.
दिवसेंदिवस नगर जिल्ह्यातील परिस्थित कठीण बनत चालली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नाहीत, रेमडिसीवीर औषध मिळत नाहीत. तर काही भागात बेड मिळत नसल्याचे चित्र आहे.
यावर उपाय म्हणुन नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन केले तर कोरोना संसर्ग आपण रोखू शकू. मात्र अनेकजन नियमाचे पालन करत नसून बेजबाबदारपणे वागत आहेत.
मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा बेजबाबदार नागरिकांमुळे वाढताच आहे. आज शनिवारी जिल्ह्यात 3890 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 999, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1101 तर अँटीजेन चाचणीत 1680 असे 3780 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 970 वर गेला असून नगर ग्रामीण 376, राहाता 307, संगमनेर 297, नेवासा 246, पारनेर 185, राहुरी 183, श्रीरामपूर 158, श्रीगोंदा 155, कोपरगाव 151, शेवगाव 139, जामखेड 138, कर्जत 137, अकोले 115, पाथर्डी 108 भिंगार कन्टेंमेंट 79, इतर जिल्हा 27, मिलटरी हॉस्पिटल 08, इतर राज्य 01 असे रुग्ण आढळले आहेत.
यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 207, नगर ग्रामीण 39, राहाता 69, संगमनेर 92, नेवासा 44, पारनेर 87, राहुरी 09, श्रीरामपूर 48, श्रीगोंदा 06, कोपरगाव 47, शेवगाव 37, जामखेड 107, कर्जत 61, अकोले 64, पाथर्डी 46, भिंगार कन्टेंमेंट 26, इतर जिल्हा 02, मिलटरी हॉस्पिटल 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 501, नगर ग्रामीण 122, राहाता 97, संगमनेर 133, नेवासा 18, पारनेर 05, राहुरी 23, श्रीरामपूर 67, श्रीगोंदा 10, कोपरगाव 11, शेवगाव 21, जामखेड 03, कर्जत 13, अकोले 11, पाथर्डी 27, भिंगार कन्टेंमेंट 27, इतर जिल्हा 11, इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1680 जण बाधित आढळून आले. मनपा 262, नगर ग्रामीण 215, राहाता 141, संगमनेर 72, नेवासा 184, पारनेर 93, राहुरी 151, श्रीरामपूर 43, श्रीगोंदा 139, कोपरगाव 93, शेवगाव 81, जामखेड 28, कर्जत 63, अकोले 40, पाथर्डी 35, भिंगार कन्टेंमेंट 26, इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
VUpwMxzhCtDOdS