तहसिलदार ज्योती देवरे यांचे आदेश
पारनेर । वीरभूमी- 28-Apr, 2021, 12:00 AM
पारनेर येथे वाढती कोरोना बाधित रुग्ण संख्या लक्षात घेता तसेच नागरिकांकडून नियमाचे उल्लंघन होत आहे.
यामुळे महसूल व पोलीस प्रशासन यांनी खुल्या ठिकाणी भरत असलेल्या बाजारावर कारवाई करीत पाच दिवसांसाठी पूर्ण पारनेर तालुका अत्यावश्यक मेडिकल व हॉस्पिटल सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि मृत्यूचे प्रमाण पाहता पारनेर तालुक्यात पाच दिवसांसाठी संपूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अत्यंत अत्यावश्यक म्हणजे दवाखाने, मेडिकल व पेशंटला नेणेसाठी अॅम्बुलन्स व फक्त दळणवळण साधने सुरू आहेत. या व्यतिरिक्त कंपनीत जाणारे लोक किंवा घराबाहेर पडणारे लोक, अन्य कामासाठी किराणा, भाजीपाला घेण्यासाठी रस्त्यावर येणारे लोक या सर्वांना हजार रुपये दंडाची पावती फाडावी लागणार आहे.
पारनेर शहरातील सर्व भाजीबाजार, किराणा दुकाने बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.
अन्यथा कारवाई करण्यात येईल असेही तहसिलदार ज्योती देवरे यांनी आदेश काढले आहेत.
Comments