शेवगाव । वीरभूमी- 28-Apr, 2021, 12:00 AM
कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेक निरापराध नागरीकांचा उपचाराअभावी बळी गेलेला आहे. राज्यातील अरोग्य सुविधा कमी पडत आहे. कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांच्या तपासणी, उपचार किंवा लसीकरणबाबत कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना किंवा भूमिका नसल्याने भविष्यातील अडचण ओळखून दिव्यांगासाठी आ. मोनिका राजळे यांनी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी सावली दिव्यांग संघटनेने केली होती. या मागणी तातडीने पूर्ण करत आ. मोनिका राजळे आपल्या आदी फाउंडेशनच्या माध्यमातून शेवगाव येथे 100 बेडचे लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर सुरू करत त्यामध्ये दिव्यांगासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे.
या कोविड सेंटरचे उद्घाटन ह. भ. प. राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांगासाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारल्याबद्दल सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे व चाँद शेख यांनी आ. मोनिका राजळे यांचे आभार मानले.
यावेळी सावली दिव्यांग संस्थचे उपाध्यक्ष चाँद शेख म्हणाले, सावली दिव्यांग संस्थेच्या मागणीला यश आले असून दिव्यांग कोरोना सेंटर चालू करून आ. मोनिका राजळे यांनी दिव्यांग बांधवांना दिलासा दिला. त्याच प्रमाणे भविष्यात लसीकरणासाठी गर्दी होणार असून दिव्यांग बांधवाना कोरोना लसीकरण स्वतंत्रपणे करण्याबाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांना विनंती केली. या मागणीलाही तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना भाकड, गटविकास अधिकारी महेश डोके, पोलीस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, आरोग्य अधिकारी डॉ. रामेश्वर काटे, विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर,
भाजपाचे सरचिटणीस सुनील रासणे, माजी उपनगराध्यक्ष वजीर शेख, माजी नगरसेवक सागर फडके, कमलेश गांधी, नवनाथ कवडे, गंगा खेडकर, तापडिया महाराज, सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख, सचिव नवनाथ औटी, सावली दिव्यांग संघटना तालुका उपाध्यक्ष संभाजी गुठे, कार्याध्यक्ष मनोहर मराठे, शहरउपाध्यक्ष सुनील वाळके, राजू दुसंगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र कोविड सेंटर सुरू झाल्याने दिव्यांग बांधवामध्ये कोरोना विषयी असलेली दहशत कमी झालेली आहे. कोरोनाग्रस्त दिव्यांग बांधवांनी या सेंटरमध्ये दाखल होवुन अद्यावत सुविधेद्वारे आपल्यावर उपचार करून घ्यावेत, असे आवाहन नवनाथ औटी यांनी केले.
Comments