नाहीतर होईल कारवाई । जिल्हाधिकार्यांचे आदेश
अहमदनगर । वीरभूमी - 01-May, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना करत आहे. मात्र कोरोना संसर्ग थांबत नाही. याचे कारणही तसेच आहे. कारण अनेक लोक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरतांना आढळून येतात. ही बाब जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एका आदेशाने दुचाकी चालकांवरही निर्बंध घातले आहेत.
यामुळे दुचाकी चालकाला दि. 2 मे ते 15 मे या काळात वैद्यकीय कारण वगळता दुचाकीवर एकपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवासास मनाई करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोरोना सनसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या केल्या जात आहेत.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाठीमागे जाहीर केलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवा व आदेशात नमुद इतर बाबी वगळता निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. तथापि, सूट असलेल्या सेवांकरीता मोठ्या प्रमाणात दुचाकीवर दोन व्यक्ती फिरत असल्याचे निदर्शनास आलेली आहे. तथापि, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी दुचाकीवर एक पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवासास मनाई करणे आवश्यक आहे.
यामुळे जिल्ह्यामध्ये दि. 2 मे 2021 ते दि. 15 मे 2021 या कालावधीत वैद्यकीय कारण वगळून दुचाकीवर एकपेक्षा अधिक व्यक्तीस प्रवासास मनाई करण्यात आली आहे.
याचे उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियमन 1897 मधील तरतुदीनुसार भादंवि कलम 1860 च्या कलम 188 नुसार दंडात्मक अथवा कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
Comments