अहमदनगर । वीरभूमी- 08-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यात आज तब्बल 4182 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 77 हजार 286 इतकी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात वाढ होऊन ते आता 86.07 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 3612 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती आता 26 हजार 419 इतकी झाली आहे.
आज शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 1018, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1945 आणि अँटीजेन चाचणीत 649 रुग्ण बाधीत आढळले.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 812, अकोले 107, जामखेड 126, कर्जत 35, कोपरगाव 257, नगर ग्रामीण 475, नेवासा 205, पारनेर 247, पाथर्डी 162, राहाता 354, राहुरी 243, संगमनेर 377, शेवगाव 66, श्रीगोंदा 263, श्रीरामपूर 252, कॅन्टोन्मेंट 63, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 132 आणि इतर राज्य 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 5 हजार 987 वर पोहोचली असून आतापर्यंत तब्बल 1 लाख 77 हजार 286 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2282 रुग्णांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. तर सध्या 26 हजार 149 जणांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, विनाकारण घराबाहे पडू नये, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित स्वच्छ हात धुवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
KLNQVSjOYGoDJAu