आ रोहित पवार यांच्याकडून देखील नवले यांच्या जेवणाचे कौतुक
कर्जत | वीरभूमी 09-May, 2021, 12:00 AM
मागील एक वर्षापासून कोरोना रुग्ण गोरगरीब गरजवंत नागरिकांना दररोज ५०० जणांना कर्जतचे राहुल नवले आणि त्यांची पत्नी पुजा नवले हे दाम्पत्य स्वतःच्या हाताने तयार केलेेेलेे जेेवन प्रेमाने भरवत आहे. कोरोना उपचाराबरोबर नवले दाम्पत्याचे सुगरण जेवण कोरोनाबाधितांसाठी जीवनदायी ठरत आहे. मागील एक वर्षापासून नवले कुटुंबीयाचे जेवण गरीब आणि गरजवंतासाठी मोठा आधार बनला आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांची ही सेवा मोठ्या आनंदाने नवले कुटुंब करीत आहेत.
कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील गरीब शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले राहुल नवले हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचीत आहे. लहानपणापासून राहुल सामाजिक कार्यात अग्रेसर राहत असे परखड स्वभाव ही त्याची वेगळीच खासियत. कोणत्याही अडचणीत व गरीब व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाणं, त्यांना सहकार्य करणं हा त्यांचा मूळ स्वभाव.
आज कोरोनाशी लढा देत असताना आपल्या कुटूंबा बरोबर आपल्या आजूबाजूचे अनेक मित्र, नातेवाईक कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी लढा देत आहे. मग मी फक्त 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणून कस चालेल, तर त्यापुढे मी 'माझा समाज ही माझी जबाबदारी' ही भावना राहुल यांनी आत्मसात करण्याची भूमिका अंगिकारली. याच सामाजिक दायित्वतून राहुल नवले सर्वतोपरी सहकार्य आणि मदत प्रशासन व सर्वसामान्य गरजवंत नागरिकांना देत आहे. मागील १ वर्षापासून राहुल व त्यांचे कुटूंब कोरोनाबाधितांसाठी प्रशासनाने दिलेली जेवणाची प्रमुख जबाबदारी पार पाडत आहे.
यामध्ये प्रमुख्याने त्यांना मोलाची साथ मिळाली दिली त्यांची पत्नी पूजा नवले यांनी. यांसह राहुल यांचे आई-वडील व भाऊ-भावाची पत्नी देखील वेळप्रसंगी त्यांना मोलाची साथ देत आहे. राहुल नवले यांच्या या सामाजिक कामाची दखल आमदार रोहित पवार यांनी देखील घेतली. आ पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राहुल नवले यांच्या जेवणाचा दर्जाचा आवर्जून उल्लेख करत त्यांच्यां पाठीवर कौतुकाची थाप टाकली. यासह कोव्हीड सेंटरला भेट देत असताना अनेक सर्वसामान्य नागरिकांनी दिलेले उत्कृष्ट आणि सुगरण जेवनाचे प्रमाणपत्र दिल्याने त्यांचा खास सत्कार केला.
Comments