अहमदनगर । वीरभूमी - 10-May, 2021, 12:00 AM
दोन दिवसानंतर पुन्हा पुन्हा एकदा कोरोना बाधितांचा आकडा चार हजारावर आला आहे. आज सोमवारी जिल्ह्यात तब्बल 4059 कोरोना बाधित आढळले. मात्र यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे नेहमी चारशेपार असलेल्या नगर शहराचा आकडा आज प्रथमच 284 वर आला आहे.
मागील दोन दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असतांनाच आज सोमवारी पुन्हा चार हजार पार गेला आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर संगमनेरने वर्चस्व मिळवले असून नगर ग्रामीणने आपली जागा दुसर्या स्थानावर कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे राहाता तालुक्यानेही आपली जागा तिसर्या क्रमांकावर कायम ठेवली मात्र नेवासा, शेवगावने 300 चा आकडा पार करत चौथ्या व पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे.
कोरोना संसर्ग वाढू लागल्यापासून नगर शहराचा आकडा हा प्रथमच 300 च्या आत आल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या नगर शहरात कडक लॉकडाऊन सुरू असल्याने आठ दिवसानंतर त्याचा परिणाम आज दिसून आला. यामुळे प्रथमच कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला आहे.
मात्र इतर तालुक्यात कडक लॉकडाऊन असतांनाही कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. आज राहाता, नेवासा, शेवगावची आकडेवारी 300 पार गेली आहे. इतर तालुक्यांची आकडेवारीही शंभरच्या पुढे राहीली आहे.
दोन दिवसा कमी झालेल्या आकडेवारीने दिलासा मिळत्त होता. मात्र आज पुन्हा आकडेवारीत भर पडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही आकडेवारी नागरिकांच्या बेजजबाबदारीने वाढत असून नागरिकांनी नियम पाळले तर आकडेवारी आटोक्यात येईल, मात्र याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 2081, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1356 तर अँटीजेन चाचणीत 622 असे 4059 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 594, नगर ग्रामीण 377, राहाता 317, नेवासा 311, शेवगाव 306, नगर शहर 284, पाथर्डी 272, अकोले 260, पारनेर 220, श्रीरामपूर 205, श्रीगोंदा 197, राहुरी 196, कर्जत 157, कोपरगाव 154, जामखेड 111, इतर जिल्हा 65, भिंगार काँटोन्मेंट 22, मिलटरी हॉस्टिपीटल 11 असे रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
zDmGtIAVOLwhPqMl