म्युकरमायकोसीस आजाराने जिल्ह्यात एकाचा मृत्यू
मिरजगाव । वीरभूमी- 15-May, 2021, 12:00 AM
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे म्युकरमायकोसीसचे दोन रूग्ण आढळले आहे. या बुरशीजन्य आजाराने येथील एका 35 वर्षीय तरूण शेतकर्याचा बळी घेतला आहे. तर दुसरे 55 वर्षीय महिला शेतकरी रूग्णावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
म्युकरमायकोसिस या आजाराने जिल्ह्यातील व कर्जत तालुक्यातील हा पहिला बळी घेतला आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने कर्जत तालुक्यात शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील एका शेतकरी रुग्णाचा या बुरशीजन्य आजाराने नुकताच मृत्यू झाला आहे.
अल्पभूधारक शेतकरी असलेल्या एकास मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर म्युकरमायकोसीस या आजाराने शस्त्रक्रिया दरम्यान त्याचा त्यामध्ये डोळा गमावला. यातच त्याचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुली, एक मुलगा आहे.
दुसरी महिला रूग्ण वय 55 या कोरोना बाधित झाल्यानंतर त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना देखील या बुरशीजन्य आजाराने पछाडले. त्यांना दात व घसा या भागादरम्यान वेदना होत असल्याने शस्त्रक्रिया दरम्यान नऊ दाते गमवावे लागले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र, या आजारातून उलगडण्याकरिता महागडे औषधे आणावी लागत असल्याने या कुटुंबियांनी या आजारापुढे हात टेकले आहे. तुटपुंज्य शेती व त्यावरच या कुटुंबियांचा उदरनिर्वाह असल्याने या आजारावरील उपचाराकरिता शासनाने मदत करावी, अशी मागणी रुग्णांचे पतीने केली आहे.
तर मृत झालेल्या शेतकरी तरूणाच्या कुटुंबियांला लाखो रूपये उपचारादरम्यान परिस्थिती नसताना खर्च करावे लागले. मात्र तरी देखील या कुटुंबियातील कर्ता पुरूष गेल्याने या कुटुंबियाला देखील मदत मिळावी अशी मागणी, केली जात आहे.
राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने अहंकार माजविला आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. वाड्यावस्त्यांवर कोरोना बाधित एकीकडे कोरोनााचा विळखा घट्ट होत असताना कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांसमोर आता आणखीन एक मोठे म्युकरमायकोसीस या आजाराचे संकट उभे ठाकले आहे. अशा आजाराच्या रूग्णांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी, सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.
CrkgLpmDAQWFuZRX