अहमदनगर । वीरभूमी - 21-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी संथगतीने घटू लागली आहे. आज शुक्रवारीही गुरुवारच्या तुलनेत 145 ने कोरोना बाधितांची घट झाली आहे. आज जिल्ह्यात एकुण 2492 कोरोना बाधित आढळले आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडेवारी घटत असल्याने काहीअंशी दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कधी घट होत आहे तर कधी वाढ होत आहे. बुधवारी 3779 वर गेलेला आकडा गुरुवारी कमी होऊन 2637 वर आला आहे. तर आज शुक्रवारी यामध्ये 145 ने घट झाल्यानंतर तो 2492 वर आला आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा हा संगमनेर तालुक्याचा असून तो 294 एवढा आहे. या खालोखाल अकोले 270, नगर शहर 240, नेवासा 227, श्रीगोंदा 224 असे कोरोना बाधित आढळले तर शेवगाव, कर्जत, जामखेड तालुके वगळता इतर तालुक्यातील संख्या ही शंभरच्या पुढे आहे.
आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 284, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1038 तर अँटीजेन चाचणीत 1170 असे 2492 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली आकडेवारी- संगमनेर 294, अकोले 270, नगर शहर 240, नेवासा 227, श्रीगोंदा 224, पारनेर 186, नगर ग्रामीण 184, राहाता 153, श्रीरामपूर 144, कोपरगाव 136, पाथर्डी 119, राहुरी 105, शेवगाव 91, कर्जत 41, जामखेड 35, इतर जिल्हा 34, भिंगार कँटोन्मेंट 06, इतर राज्य 02, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावा, हात स्वच्छ धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments