पाथर्डी । वीरभूमी- 21-May, 2021, 12:00 AM
पाथर्डी शहरात आ. मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मा. आ. राजीव राजळे कोविड सेंटरमधील रुग्णांना पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर व मा. आ. राजीव राजळे मित्र मंडळाच्यावतीने मांसाहारी जेवणाची मेजवानी देण्यात आली.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांना योग्य उपचार मिळावेत व त्यांची होणारी हेळसांड विचारात घेऊन शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी शहरात मा. आ. राजीव राजळे कोविड सेंटर उभारण्यात आले.
या कोविड सेंटरमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून या कोविड सेंटरमध्ये मिळणार्या सुविधा व घेतली जाणारी काळजी आणि मिळणारा दिलासा यामुळे आतापर्यंत शेकडो रुग्णांनी हसतखेळत कोरोनावर मात केली आहे. मा. आ. राजीव राजळे कोविड सेंटरमधील कोरोना बाधितांची कुटुंबाप्रमाणेच काळजी घेतली जात आहे.
त्यातच कोरोना उपचारात महत्वाचे असणारे मांसाहारी जेवनही कोरोना बाधितांना दिले जाते. आज शुक्रवारी मा. आ. राजीव राजळे कोविड सेंटरमधील रुग्णांना पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर व मा. आ. राजीव राजळे मित्र मंडळाच्यावतीने मांसाहारी जेवण देण्यात आले. कोविड सेंटरमधील रुग्णांनी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला.
रुग्णांना मांसाहारी जेवण देतेवेळी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक नामदेव लबडे, नगरसेवक महेश बोरुडे, डॉ. रमेश हंडाळ, बबनराव बुचकूल, खरेदी विक्री संघाचे संचालक संदीप पठाडे, जमीर आतर, अंकुश राजळे, आप्पासाहेब राजळे, उमेश तिजोरे, हरिहर गर्जे, सोमनाथ बोरुडे, दादासाहेब कंठाळी, संदीप लोखंडे, महादेव ठोंबरे आदी उपस्थित होते.
कोविड सेंटरमधील रुग्णांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेतली जात असून रुग्णांना धीर देण्याचे काम केले जात आहे. आ. मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली सक्रीयपणे काम केले जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
Comments