अहमदनगर । वीरभूमी - 23-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी आज शनिवारप्रमाणेच स्थिर असून शनिवारच्या तुलनेत आज 5 ने घट झाली आहे. आजचा आकडाही दोन हजाराच्या आत असून आज रविवार दि. 23 रोजी जिल्ह्यात 1851 कोरोना बाधित आढळले. गेल्या चोवीस तासात पुन्हा 5 ने घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सध्या हळु हळु घट होऊन लागल्याने नगरकरांना काहीअंशी दिलासा मिळत आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर शनिवारपासून एकुण आकडा दोन हजाराच्या आत आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे.
विशेष म्हणजे संगमनेरचा आकडा आज सर्वोच्च राहीला. मात्र तोही 220 वर स्थिरावला आहे.
अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर एकाही तालुक्याचा आकडा तीनशे पार नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. आज संगमनेर पाठोपाठ पारनेर 181, नगर ग्रामीण 173, अकोले 155, श्रीगोंदा 142, नगर शहर 132, पाथर्डी 127 हा उतारता आकडा असून राहाता, श्रीरामपूर, कर्जत, शेवगाव, जामखेड तालुक्याची आकडेवारी शंभरच्या आत आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 370, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 493 तर अँटीजेन चाचणीत 988 असे 1851 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली आकडेवारी- संगमनेर 220, पारनेर 181, नगर ग्रामीण 173, अकोले 155, श्रीगोंदा 142, नगर शहर 132, पाथर्डी 127, नेवासा 111, राहुरी 111, राहाता 91, श्रीरामपूर 90, कर्जत 85, शेवगाव 43, जामखेड 35, इतर जिल्हा 21, भिंगार कँटोन्मेंट 11, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावा, हात स्वच्छ धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments