अहमदनगर । वीरभूमी - 25-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी आजही दोन हजार पार राहीली. मात्र सोमवारच्या तुलनेत आज एकुण आकडेवारीत 72 ने घट झाली आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण 2191 कोरोना बाधित आढळून आले.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कधी घट तर कधी वाढ होत असल्याचे चित्र आहे. काल 421 ने वाढ झाल्यानंतर आज मंगळवारी 72 ने कोरोना बाधितांचा आकडा घटला आहे. आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीत श्रीरामपूर तालुक्याची आकडेवारी 300 पार गेली आहे. तर पाथर्डीची आकडेवारी 219 वर गेली आहे. तर राहुरी, कर्जत, अकोले तालुके वगळता इतर तालुके शंभरच्या पुढे आहेत.
हळु हळु कमी होऊ लागलेली आकडेवारीत आजही थोडीसी घट झाल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे. वाढणार्या आकडेवारीला नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत आहे. नागरिकांनी नियमाचे पालन केले तर आकडेवारी कमी होणयास निश्चित मदत होणार आहे.
संपूर्ण नगर जिल्ह्यात हिवरे बाजार पॅटर्न प्रशासनाच्यावतीने राबविला जात असून याबाबत गावागावात बैठका घेऊन पॅटर्न समजावून सांगत त्याप्रमाणे आखणी केली जात आहे. यामुळे लवकरच जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आटोक्यात येईल अशी आशा आहे.
आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 565, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 811 तर अँटीजेन चाचणीत 815 असे 2191 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली आकडेवारी- श्रीरामपूर 320, पाथर्डी 219, संगमनेर 171, नेवासा 159, राहाता 158, पारनेर 157, श्रीगोंदा 156, नगर ग्रामीण 155, शेवगाव 151, कोपरगाव 121, नगर शहर 108, जामखेड 102, राहुरी 78, कर्जत 57, अकोले 44, इतर जिल्हा 26, भिंगार 07, मिलटरी हॉस्पिटल 01, इतर राज्य 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.
कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करावे, विनाकारण घराबाहे पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
dxjRceslLJ