अहमदनगर । वीरभूमी - 26-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीत आज 16 ने वाढ झाली असून एकुण आकडा आजही दोन हजार पार राहीला आहे. मात्र मंगळवारच्या तुलनेत आज एकुण आकडेवारीत थोडीसी वाढ झाली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 2207 कोरोना बाधित आढळून आले.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कधी घट तर कधी वाढ होत असल्याचे चित्र आहे. 72 ने वाढ झाल्यानंतर आज बुधवारी 16 ने कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीत श्रीरामपूर तालुक्याने आपला प्रथम क्रमांक कायम राखला आहे. मात्र मंगळवारच्या तुलनेत यामध्ये घट होऊन एकुण बाधित 235 रुग्णांची नोंद झाली आहे.
त्याखालोखाल श्रीगोंदा 216, संगमनेर 207 असे दोनशेच्या पुढे राहीले. तर शेवगाव 185, राहुरी 163, पाथर्डी 158, पारनेर 144 असे दोनशेच्या राहीले आहेत. तर नेवासा, अकोलेचा आकडा शंभरच्या आत रहीला आहे.
जिल्ह्यातील एकुण आकडेवारी कमी होत असतांनाच आज फक्त 16 बाधिताने वाढ झाली आहे. या वाढणार्या आकडेवारीला नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत असून नागरिकांनी नियमाचे पालन करावे. नियमाचे पालन केले तर आकडेवारी कमी होण्यास निश्चित मदत होणार आहे.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 384, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1118 तर अँटीजेन चाचणीत 705 असे 2207 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली आकडेवारी- श्रीरामपूर 235, श्रीगोंदा 216, संगमनेर 207, शेवगाव 185, राहुरी 163, पाथर्डी 158, पारनेर 144, नगर ग्रामीण 141, कर्जत 127, कोपरगाव 115, जामखेड 114, राहाता 109, नेवासा 98, नगर शहर 86, अकोले 66, इतर जिल्हा 37, भिंगार 04, मिलटरी हॉस्पिटल 01, इतर राज्य 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.
कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करावे, विनाकारण घराबाहे पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
hZuzwodMrGCR