‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रमास करंजीत उत्स्फूर्त प्रतिसाद
करंजी । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
तालुका प्रशासनाने करंजी ता. पाथर्डी येथे तलाठी कार्यालया अंतर्गत प्रशासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत 7/12 संगणीकरण व दुरुस्ती हा उपक्रम राबवला. या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.
गेल्या अनेक दिवसापासून महसूल खात्याबाबत शेतकर्यांना अडचणी येत होत्या. 7/12 उतार्यावर नाव नसने, नावात दुरुस्ती करने, क्षेत्र कमी किंवा जादा लागणे, खराबा नोंद नसणे, जिरायत लागवडी योग्य क्षेत्र लावणे अशा अनेकबाबी दुरुस्त करणे तसेच ऑनलाईन संगणीकृत करताना झालेल्या त्रुटी व चुकांमुळे अनेक शेतकर्यांना अडचणींना सामना करावा लागत होता. त्यामुळे शेतकर्यांचे व ग्रामस्थांची वेळ व पैसा वाया जात असताना मनस्तापही मोठा सहन करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून तहसीलदार श्याम वाडकर व प्रांताधिकारी देवदत्त केकान यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाची एक टीम तयार करून महसूल आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत एक उपक्रम करंजी तलाठी कार्यालयांतर्गत येणार्या गावात घेण्यात आला.
सातबारा उतारा यासंबंधी काही अडचणी दुरुस्ती असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी संबंधिताने त्याविषयी सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन केले व याप्रकरणी ग्रामस्थांनी यास भरभरून प्रतिसाद दिला.आपल्या अडचणी सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. आज या उपक्रमाअंतर्गत 53 ग्रामस्थांचे प्रकरण दुरुस्तीसाठी तालुका प्रशासनाकडे पाठविण्यात आले.
या उपक्रमांबददल तहसीलदार, प्रांताधिकारी व टिमचे ग्रामस्थांनी आभार मानले. या उपक्रमांमध्ये मंडल अधिकारी विजय दगडखैर, तलाठी संगम अहिरे व करंजी गावचे सरपंच बाळासाहेब अकोलकर आदींनी भाग घेतला. प्रशासनाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
सरपंचाकडुन कौतुक
प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम दगडवाडी व भोसे या गावातही राबविण्यात येणार आहे. त्याबद्दल भोसे गावचे सरपंच विलास टेमकर, दगडवाडीचे सरपंच सचिन शिंदे, अशोक टेमकर, नवनाथ आरोळे, राजू मरकड यांनी तहसीलदार वाडकर साहेब, मंडळाधीकारी दगडखैर व तलाठी माहीरे यांचे आभार मानले व असा उपक्रम वर्षातुन एक वेळेस गावात घेण्याची विनंती केली आहे.
GNAHReyQShW