राज्य मार्ग व गावठाण रस्ता दरम्यान सिमेंट काँक्रीट टाकण्याची बोधेगाव ग्रामस्थांची मागणी
बोधेगाव । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे राष्ट्रीय रुरबन योजने अंतर्गत 3 कोटी रुपयांची विकास कामे पुर्णत्वाकडे आहेत. गेल्या कित्येक दिवसा पासुन सुरु असलेल्या सिमेंट रोडचे काम शासकीय गोडाउन जवळील शेवगाव ते गेवराई रोड पर्यंत आले आहे. गावातील रोड आणि डांबरी रोडच्या दरम्यान 20 फुटापर्यंतचे अंतर पडले आहे. दरम्यान याठिकाणी सिमेंट काँक्रिटचा रोड न झाल्यास कमी अधिक पावसामुळे माती निघुन खड्डे पडुन अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला मूलभूत सुविधा, आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय रुरबन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याच योजनेत बोधेगाव, हातगाव आणि सोनविहिर या गावाचा समावेश करण्यात आला आहे. योजनेच्या माध्यमातून केंद्राचा मोठा निधी ग्रामविकासाकरीता वापरण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील 3 कोटी खर्चाच्या कामात बंदिस्त गटारे आणि सिमेंट रोडचे कामे पुर्णत्वाकडे आहे. गावातील ब्राह्मण गल्ली, वाघमारे गल्ली, हनुमाननगर, शिंदे गल्ली, बेकरीच्या ठिकाणापासून ते शासकीय गोडाउन शेजारी रस्त्याचे काम कॉक्रिट टाकून पूर्ण झाले आहे. परंतु यावेळी शेवगाव- गेवराई राज्यमार्ग अवघ्या 20 ते 30 फुटापर्यंत राहिला असताना त्यावर सिमेंट कँक्रीट टाकण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.
शेवगाव- गेवराई मेन रोड आणि गावातुन आलेल्या सिमेंट रस्त्या मधील अंतर फक्त 20 ते 30 फुटापर्यंत राहिले आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने या दोन्ही रस्त्यामधील माती निघुन जाऊन, पाणी साचुन अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी सिमेंट रोड करण्यात यावा.
- माणिक गर्जे, जनशक्ती विकास आघाडी, बोधेगाव
गोडाउन डिपी शेजारील मेन रोडच्या हद्दीत आपल्याला काम करता येत नाही. रुरबन योजनेतील गोडाउन डिपी शेजारील गावातून आलेला रस्ता आणि मुख्य रोड यातील 20 ते 30 फुटाचे अंतर असून या दरम्यान मुरुम टाकून ते सुस्थितीत करण्यात येणार आहे.
- राजाराम काटे, ग्रामविकास अधिकारी, बोधेगाव
Comments