कोपरगाव । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून त्यामुळे वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला. पेट्रोल, डिझेल बरोबरच घरगुती गॅस इंधनाच्या दरवाढीचा देखील उच्चांक झालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला स्वयंपाक होतो तो एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा दर अचानक 25 रुपयांनी वाढवला आहे.
केंद्र सरकार एकामागे एक महागाईचे धक्के जनतेला देत असल्याच्या त्या निषेधार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येवून करण्यात आलेली इंधनाची दरवाढ मागे घ्यावी अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने असे म्हटले आहे की, देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीचा सामना करत असतांना दुसरीकडे अशा जीवघेण्या परिस्थितीमध्ये नागरिकांना आधार द्यायचे सोडून केंद्र सरकार वारंवार महागाई मध्ये वाढ करून सर्वसामान्यांना महागाईचे चटके देत असून यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. कोणत्याही राज्यात निवडणुका लागल्या की इंधन दरवाढ नियंत्रित ठेवली जाते आणि निवडणुका संपल्या की दिलेली आश्वासन विसरून जायची असा केंद्र सरकारचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. विरोधी पक्षात असतांना भाजपाने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले. त्यावेळच्या दुप्पट तिप्पट इंधनाचे दर झाले तरीदेखील केंद्र सरकार मुग गिळून गप्प आहे.
इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो. गेल्या दिड वर्षातल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत व ज्यांचे रोजगार आहेत त्यांच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असतांना इंधनामुळे वाढत असलेली सर्वसामान्यांच्या मुळावर उठली असून आम्ही या इंधन दरवाढीचा निषेध करीत असून करण्यात आलेली दरवाढ मागे घ्यावी, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, संकेत कडवे, रमेश गवळी, वाल्मीक लहिरे, अशोक आव्हाटे, दिनेश पवार, राजेंद्र जोशी, नारायण लांडगे, मुकुंद इंगळे, संदीप कपिले, राजेंद्र आभाळे, सागर लकारे, महेश उदावंत, विकास बेंद्रे, एकनाथ गंगूले, आकाश डागा, निखील डांगे, संदीप देवळालीकर, दिपक तिरमखे, संतोष दळवी, प्रकाश दुशिंग, विजय नागरे, बाळासाहेब रुईकर, ऋषीकेश खैरनार, अमनभाई मणियार, संतोष बारसे, तालिफ सय्यद आदी उपस्थित होते.
aPAlLdDcy