मुंबई हवामान विभागाचा अंदाज
अहमदनगर । वीरभूमी- 06-Jul, 2021, 12:00 AM
राज्यातील विविध जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा मान्सुन परतत असून आज मंगळवार दि. 6 जुलै 2021 रोजी पुढील तीन तासात गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. या दरम्यान नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मान्सुनचे आगमन झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यात अत्यल्प हजेरी लावली आहे. काही भागात शेतकर्यांनी पाऊस येईल या आशेवर पेरण्या केल्या. तर जिल्ह्यातील काही भागात अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत. जेथे पेरण्या झाल्या तेथील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात आहे.
मागील रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने अनेक शेतकर्यांनी कपाशी, बाजरी, तूर, सोयाबिन आदी पेरण्या केल्या होत्या. मात्र रविवारी झालेल्या पावसानंतर आठवडा झाला तरी पाठ फिरवल्याने शेतकर्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
त्यातच आज मंगळवार दि. 6 जुलै 2021 रोजी मुंबई हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामध्ये मुंबई हवामान विभागाने म्हटले आहे की, मंगळवार दि. 6 जुलै 2021 रोजी आगामी तीन तासात अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात 30 ते 40 किलोमीटर/तास यानुसार गडगडाटासह हलकाचा पाऊस पडणार आहे. तरी नागरिकांनी काळजी घेत झाडाखाली उभे राहु नये, शेतातील कामे उरकुन घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळपासुन ढगाळ वातावरण असून शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसला आहे. आज व आगामी काही दिवसात चांगला पाऊस झाला तर दुबार पेरणीचे संकट टळून राहीलेल्या पेरण्या होतील. अन्यथा हा हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
YwHgTmzCXUPMLpl