शेवगावमधील या मुंडे समर्थकांनी दिले राजीनामे
शेवगाव । वीरभूमी- 12-Jul, 2021, 12:00 AM
खा. प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात डावलल्यामुळे नाराज झालेल्या मुंडे समर्थकांनी राजीनामे सत्र सुरू केले आहे. बीड पाठोपाठ पाथर्डी तालुक्यातील समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर आज सोमवारी शेवगाव तालुक्यातील पदाधिकार्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
आता या राजीनामा दिलेल्या समर्थकांची समजुत काढण्यासाठी मंगळवारी पंकजा मुंडे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून राहीले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खा. डॉ. प्रितम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे नाराज भाजप पदाधिकार्यांचे राजीनामे सत्र आज सोमवारीही सुरुच होते. आज सोमवारी सकाळी शेवगाव तालुक्यातील मुंडे समर्थकांनी शहरातील मुंडे चौकामध्ये एकत्र येऊन आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिले.
आज राजीनामे दिलेल्या पदाधिकार्यांमध्ये भाजपाचे शेवगाव तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा आशाताई गरड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गंगा खेडकर, युवा मोर्चाचे शेवगाव तालुकाध्यक्ष सचिन वारकड, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश भालसिंग, भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डमाळे, भाजपाचे सरचिटणीस संदीप वाणी, सरचिटणीस नवनाथ कवडे, केशव आंधळे, कार्यालयीन चिटणीस कैलास सोनवणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव भिसे, सुभाष बडधे, सुधीर जायभाये यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
तर या अगोदर गणेश कराड, कचरू चोथे, कमलेश गांधी, आंबादास ढाकणे, गुरुनाथ माळवदे आदींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
TZVFULurQojKE